डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मुंबई उच्च न्यायालयानं २०१५ च्या गोविंद पानसरे हत्याकांड प्रकरणाच्या तपासावरील देखरेख थांबवण्याचा निर्णय

मुंबई उच्च न्यायालयानं २०१५ च्या गोविंद पानसरे हत्याकांड प्रकरणाच्या तपासावरील देखरेख थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणातल्या दोन फरार आरोपींना शोधून काढण्याचं मुख्य काम आता उरलं आहे, असं न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठानं काल सांगितलं. तपास यंत्रणेवरील सततच्या देखरेखीविरोधातली याचिका त्यांनी निकाली काढली. मात्र या प्रकरणातली सुनावणी दैनंदिन तत्वावर घेण्याचे निर्देश खंडपीठानं खालच्या न्यायालयाला दिले. पानसरे हत्याकांडाचा तपास सुरुवातीला गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडे होता, त्यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशावरून तो दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला.