डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

March 31, 2025 3:45 PM | Bombay High Court

printer

अपघातग्रस्तांना वैद्यकीय विम्या अंतर्गत मिळालेले पैसे वजा करता येणार नाहीत – मुंबई उच्च न्यायालय

मोटार वाहन कायद्याअंतर्गत अपघातग्रस्तांना मिळणाऱ्या भरपाईतून वैद्यकीय विम्या अंतर्गत मिळालेले पैसे वजा करता येणार नाहीत, असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. विमा कंपनीसोबत केलेल्या करारानुसार त्या व्यक्तीला वैद्यकीय विम्या अंतर्गत रक्कम मिळते असं न्यायालयाने सांगितलं. न्यायमूर्ती ए एस चांदुरकर, मिलिंद जाधव आणि गौरी गोडसे यांच्या पीठाने हा निर्णय दिला. एकल आणि खंडपीठाकडून विविध दृष्टीकोन मांडल्यानंतर हे प्रकरण पूर्ण पीठाकडे वर्ग करण्यात आलं.