सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरी बुच यांच्यासह इतर पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याच्या विशेष न्यायालयाच्या आदेशाला आज मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. विशेष न्यायाधीश एस. ई. बांगर यांनी माधवी पुरी बुच यांच्यासह इतर पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले होते. त्याविरोधात पुरी यांच्यासह इतर पाच जणांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत एफआयआर दाखल करण्याचा आदेश रद्द करण्याची विनंती केली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत ही विनंती मान्य करत विशेष न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली.
Site Admin | March 4, 2025 1:37 PM | Bombay High Court
सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरी बुच यांच्यावर FIR दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती
