डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

दिशा सॅलियन हिच्या मृत्यशी संबंधित याचिकेची सुनावणी येत्या २ एप्रिलला होणार

दिशा सॅलियन हिच्या मृत्यशी संबंधित घटनेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे तसंच इतरांच्या विरोधात प्रथम माहिती अहवाल दाखल करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी येत्या २ एप्रिलला होणार आहे. दिशाचे वडील सतिश सॅलियन यांनी ही याचिका दाखल केली आहे. ८ जून २०२० रोजी दिशानं आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पार्टीत आदित्य ठाकरे तसंच अभिनेते सुरज पांचोली आणि डिनो मोरिया उपस्थित होते. मात्र, या पार्टीनंतर झालेल्या तिच्या मृत्यूनंतर काही अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नांची उकल होण्याच्या दृष्टीनं आपण ही याचिका दाखल केल्याचं सॅलियन यांनी म्हटलं आहे.