August 16, 2025 7:51 PM

printer

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू बॉब सिम्पसन यांचं निधन

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू बॉब सिम्पसन यांचं आज निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते.  अष्टपैलू क्रिकेटपटू असलेल्या  सिम्पसन यांनी ऑस्ट्रेलियाच्या संघाचं कर्णधारपद भूषवलं होतं. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या पुनरुज्जीवनात त्यांचं योगदान  महत्त्वपूर्ण मानलं जातं.  १९८० आणि १९९० च्या दशकात ऑस्ट्रेलियाच्या संघाचे ते प्रशिक्षक होते. 

 

सिम्पसन यांनी १९५७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केलं. त्यांनी ६२ कसोटी सामने खेळले असून ४ हजार ८६९ धावा केल्या.  यामध्ये १० शतकं आणि २७ अर्धशतकांचा समावेश होता.  उत्तम लेग स्पिनर असलेल्या सिम्पसन यांनी ७१ गडी बाद केले होते.