BMC Elections : भाजपा आघाडीवर, ठाकरे बंधू पिछाडीवर

आतापर्यंत आलेल्या निकाल आणि कलानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेत भाजपा आणि शिवसेना युतीला निर्णायक आघाडी मिळताना दिसत आहे. शिवसेना भाजपा युती ११९ जागांवर आघाडीवर आहे, यात भाजपा ८८ तर शिवसेना ३१ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा पक्ष ६४ जागांवर तर राज ठाकरे यांचा पक्ष केवळ सहा जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेवर भाजप आणि शिवसेना युती सत्ता स्थापन करणार हे जवळपास निश्चित झालं आहे. 

 

ठाणे महानगरपालिकेत शिवसेना २४, भाजपा ५, राष्ट्रवादी काँग्रेस ४, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ४, एमआयएम ५ जागांवर विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे १९, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ६, भाजपाचे दोन, एमआयएमचा एक उमेदवार आघाडीवर आहे. 

 

नवी मुंबईमधे भाजपा ७२, शिवसेना २७, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दोन जागेवर आघाडीवर आहे. 

 

वसई विरारमधे बहुजन विकास आघाडीचे ६३ उमेदवार आतापर्यंत विजयी झाले आहेत. तर भाजपाचे २४ उमेदवार विजयी झाले आहेत. 

 

पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचे ३१ उमेदवार विजयी  झाले आहेत. काँग्रेसचे चार, शिवसेनेचे दोन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले आहेत. 

 

भिवंडीत कोणार्क विकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. 

 

उल्हासनगर मधे भाजपाचे १९, शिवसेनेचे १६, वंचित बहुजन आघाडीचे दोन, आणि काँग्रेस आणि मनसेचे प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले आहेत. 

 

कल्याण डोंबिवलीमधे भाजपा २८, शिवसेना २८, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दोन, मनसे चार जागांवर आघाडीवर आहे.