काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी आघाडीची घोषणा केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित आघाडीचे नेते धैर्यवर्धन पुंडकर यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत या आघाडीची घोषणा केली. या आघाडीअंतर्गत मुंबईतल्या २२७ जागांपैकी ६२ जागा वंचित बहुजन आघाडी लढवणार आहे.
संविधानाला अभिप्रेत भारत घडवणं हाच दोन्ही पक्षांचा राजकीय अजेंडा असल्यानं दोन्ही पक्षांतली मैत्री नैसर्गिक स्वरूपाची असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं. राज्यातील अन्य २८ महापालिकांसाठीही आघाडीची चर्चा सुरू असल्याचंही ते म्हणाले.