मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. सर्व २२७ जागांवर लढायची काँग्रेसची तयारी असल्याचं ते म्हणाले. मुंबई हे मोठं शहर असून देशाच्या विविध भागांमधून आलेले लोक इथं राहतात. त्यांच्यात एकता राखण्यासाठी आणि त्यांच्या हितासाठी काँग्रेसनं हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. या निवडणुकीतही धर्मा-धर्मामध्ये फूट पाडायचा प्रयत्न होत असून हे राजकारण संपायला हवं, असं मत त्यांनी मांडलं.