बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वायू गुणवत्ता वाढावी यासाठी अनेक उपाययोजाना केल्या जात असून गेल्या ४८ तासांत वायू गुणवत्ता निर्देशांकात लक्षणीय सुधारणा झाल्याचं महानगरपालिकेनं म्हटलं आहे. मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. बेकरी तसंच स्मशानभूमीचं स्वच्छ इंधनावर परिवर्तन, धूळ आटोक्यात आणण्यासाठी मिस्टींग मशीनच्या सहाय्याने फवारणी, पाण्याने रस्ते धुऊन काढणं आणि विशेष स्वच्छता मोहिमेचं आयोजन, नागरिकांमध्ये जनजागृती यासह विविध उपाययोजनांचा यात समावेश आहे, महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी सांगितलं. २८ नोव्हेंबरपूर्वी वाऱ्याचा वेग प्रती तास ३ ते ४ किलोमीटर होता, तो वाढून १० ते १८ किलोमीटर प्रती तासपर्यंत पोहोचल्याचं गगराणी यांनी सांगितलं. महानगरपालिकेने जारी केलेल्या २८ मुद्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचंही काटेकोरपणे पालन होईल, असं ते म्हणाले.
Site Admin | December 1, 2025 7:42 PM | BMC
गेल्या ४८ तासांत वायू गुणवत्ता निर्देशांकात लक्षणीय सुधारणा – बृहन्मुंबई महानगरपालिका