November 26, 2024 7:15 PM | BMC

printer

मुंबईत, लोअर परळ परिसरातल्या तानसा मुख्य जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार

मुंबईत, लोअर परळ परिसरातल्या १ हजार ४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचं काम २८ नोव्हेंबर रात्री दहा वाजल्यापासून ते २९ नोव्हेंबर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातल्या लोअर परळ, करीरोड, प्रभादेवी, सेनापती बापट मार्ग या परिसरातला पाणीपुरवठा काही ठिकाणी पूर्णतः तर काही ठिकाणी अंशतः बंद राहणार आहे. तसंच ना. म. जोशी मार्ग परिसरातही पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहन मुंबई महानगरपालिकेने केलं आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.