September 10, 2024 7:06 PM | BMC

printer

मुंबई पालिकेच्या कार्यकारी सहायक लिपिक पदभरतीबाबत ‘ही’ अट रद्द

बृहन्मुंबई महानगरपालिकेतल्या कार्यकारी सहायक लिपिक पदासाठी, दहावी आणि पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावं, या अटीतली  ‘प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द करण्यात आली आहे. सुधारित शैक्षणिक अर्हतेसह, नवीन जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार असल्याचं प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्यानं अर्ज करण्याची आवश्यकता नाही,  त्यांचे अर्ज पुढच्या भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार आहेत.