डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 19, 2025 10:16 AM | Blue Ports

printer

जागतिक दर्जाचं ब्लू पोर्टस् बांधण्यासाठी भारत आणि संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेची भागीदारी

भारत आणि संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेनं जागतिक दर्जाचे ब्लू पोर्टस् म्हणजे तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक बंदरं बांधण्यासाठी भागीदारी केली आहे. मत्स्यव्यवसाय विभागानं देशातील ब्लू पोर्ट पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी  या संघटनेशी तांत्रिक सहकार्याबाबतच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. प्रायोगिक पातळीवर प्रथम दीवमधील वनकबारा, पुद्दुचेरीमधील करैकल आणि गुजरातमधील जखाऊ या तीन बंदरांसाठी एकूण 369 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या बंदरांवर कार्यक्षमता आणि सेवा वितरण वाढविण्यासाठी फाइव्ह-जी तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता,ऑटोमेशन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, असं मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ.अभिलाक्ष लिखी यांनी सांगितलं.