महाराष्ट्रातल्या पाच समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र मिळालं आहे. या यादीत रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन आणि नागावसह, पालघरमधल्या पर्णका, तसंच रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर आणि लाडघर या किनाऱ्यांचा समावेश आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती जाहीर केली. जागतिक स्तरावर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक समुद्र किनाऱ्यांना डेन्मार्कच्या फाऊंडेशन फॉर एन्व्हायरन्मेंटल एज्युकेशन संस्थेकडून ३३ निकषांच्या मूल्यमापनातून हे मानांकन दिलं जातं. पर्यावरण शिक्षण, पाण्याची गुणवत्ता, सुरक्षा आणि पर्यावरण व्यवस्थापन यांसह सेवा- सुरक्षा या घटकांचा यात समावेश असतो.
Site Admin | October 12, 2025 2:01 PM | blue flag | PM Narendra Modi
महाराष्ट्रातल्या पाच समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र