डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 24, 2024 7:19 PM | BJP

printer

महिलांवरच्या अत्याचाराच्या मुद्द्यावरुन राजकारण न करण्याचं भाजपाचं आवाहन

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजपानं आज राज्यात जागर जाणिवेचा हे अभियान राबवलं. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत इथं झालेल्या आंदोलनात अत्याचाराच्या घटनेचा निषेध केला. या प्रकरणातल्या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, यात कुणीही राजकारण करू नये असं बावनकुळे म्हणाले. इतर ठिकाणी झालेल्या आंदोलनात पक्षाचे विविध नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात मुंबईतील मादाम कामा रोड येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मविआ नेत्यांचा निषेध करणारे फलक हाती घेऊन आंदोलन करण्यात आले.