भाजपाचं उद्या पुण्यात महाअधिवेशन

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचं महाअधिवेशन उद्या पुण्यात होणार असून यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत याबाबत माहिती दिली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. शाह यांच्या भाषणानं अधिवेशनाचा समारोप होईल.