January 19, 2026 7:03 PM

printer

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नोवीन यांची निवड निश्चित

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नोवीन यांची निवड निश्चित झाली आहे. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रीया आज नवी दिल्लीत सुरु झाली. नितीन नोवीन यांच्या नावे ३७ नामांकन अर्ज आले. इतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज आलेला नाही असं निवडणूक निर्णय अधिकारी के. लक्ष्मण यांनी जाहीर केलं. दुपारी दोन ते संध्याकाळी चार पर्यंत नामांकन अर्ज भरण्याची वेळ होती. तर ६ वाजेपर्यंत माघारीची मुदत होती. नोवीन यांचा एकट्याचेच अर्ज आल्यानं पक्षाध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवडणूक होणार आहे. नोवीन सध्या कार्यकारी अध्यक्ष आहेत.