झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा जाहीरनामा प्रसिद्ध करणार

झारखंड येथे होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आजपासून आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. आसामचे मुख्यमंत्री आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे सहप्रभारी हिमंत बिस्वा सरमा यांनी आज रांची इथे वार्ताहर प्रतिनिधींशी बोलताना ही माहिती दिली. भाजपाचा जाहीरनामा टप्प्या टप्प्याने प्रसिद्ध केला जाईल. झारखंड राज्याच्या निर्मितीला २५ वर्षं पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या जाहीरनाम्यातही २५ मुद्दे असतील. भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीपूर्वी भाजपाकडून राज्याच्या विकासासाठी १५० आश्वासनं जाहीर केली जातील. येत्या वर्ष अखेरीला झारखंडमध्ये निवडणुका होणार आहेत.