डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भाजपतर्फे आजपासून तिरंगा यात्रेचं आयोजन

‘ऑपरेशन सिन्दूर’ बाबत जनजागृतीच्या उद्देशानं  भारतीय जनता पक्षानं  आजपासून देशभरात जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेला त्यांनी ‘तिरंगा यात्रा’ असं नाव दिलं असून पाकिस्तानविरोधात भारतीय लष्करानं केलेल्या यशस्वी कारवायांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. राजधानी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर आज संध्याकाळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. 

 

या मोहिमेत माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था तसंच भाजपचे वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत. ही मोहिम २३ मेपर्यंत चालणार असून त्यात पाकिस्तानातल्या दहशतवादी तळ भारतीय लष्करानं कसे उद्धवस्त केले याची सविस्तर माहिती नागरिकांना दिली जाईल. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.