भारतीय जनता पक्षानं राज्यातल्या महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांसाठी जिल्हाध्यक्षांची आज घोषणा करण्यात आली. त्यात उत्तर मुंबईसाठी दीपक तावडे, उ`त्तर पूर्व मुंबईसाठी दीपक दळवी आणि उत्तर मध्य मुंबईसाठी विरेंद्र म्हात्रे यांची निवड झाली आहे. तर ठाणे शहर जिल्हाध्यक्षपदी संदीप लेले, ठाणे ग्रामीणसाठी जितेंद्र डाकी, नवी मुंबईसाठी राजेश पाटील आणि नागपूर महानगरासाठी दयाशंकर तिवारी यांच्या नावांची घोषणा झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.