डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 13, 2024 7:31 PM | BJP | Rahul Gandhi

printer

राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात भाजपाचं आंदोलन

लोकसभतले विरोधीपक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या  आरक्षणा संदर्भातल्या कथित वक्तव्याविरोधात आज भाजपातर्फे राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं.  

 

हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे , माजी आमदार गजानन घुगे यांच्या नेतृत्त्वाखाली डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आलं.

 

नंदूरबार जिल्ह्यात नगरपालिका चौकात माजी खासदार डॉ हिना गावित यांच्या नेतृत्त्वाखाली राहूल गांधी यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. या वेळी भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

 

पालघर जिल्ह्यात विक्रमगड इथं भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी हातात फलक घेऊन राहूल गांधी यांच्या विरुद्ध घोषणाबाजी केली.

 

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही राहूल गांधी यांच्या कथित वक्तव्याचा निषेध केला आहे. दलित, आदीवासी यांचं आरक्षण कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, असंही ते म्हणाले.