भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नोबिन यांची नेमणूक झाली आहे. भाजपाच्या संसदीय मंडळाने ही नियुक्ती केल्याचं पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. नितीन नोबिन सध्या बिहार मंत्रिमंडळात मंत्री असून ते जे पी नड्डा यांच्याकडून अध्यक्षपदाचा कार्यभार घेतील. नड्डा यांचा कार्यकाळ जानेवारी २०२० मधेच संपला होता मात्र २०२४ मधल्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं त्यांना मुदतवाढ दिली होती.
नितीन नोबिन हे मेहनती कार्यकर्ता असून त्यांना संघटनाचा समृद्ध अनुभव आहे असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.
उत्तर प्रदेश भाजपाच्या अध्यक्षपदी केंद्रीय राज्य मंत्री पंकज चौधरी यांची नियुक्ती झाली आहे.