डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 19, 2024 3:17 PM | BJP | Vinod Tawde

printer

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप

पालघर जिल्ह्यात नालासोपाऱ्यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी पक्षाने केला आहे. तावडे कथितरित्या पैसे वाटत असल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे. बविआ कार्यकर्त्यांना असाच गैरसमज झाला आहे. तरीही कुणाचा काही आक्षेप असेल तर निवडणूक आयोगाकडून चौकशी व्हावी असा आपलाही आग्रही आहे, अशी प्रतिक्रिया तावडे यांनी दिली आहे.

 

याप्रकरणी भाजपा आणि तावडे यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नोटबंदी झाल्यानंतरही एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम भाजपाच्या लोकांकडेच कशी येते असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.