भाजपा हाच राज्यातला सर्वात मोठा पक्ष आहे, हे नगरपालिका निवडणुकंच्या निकालातून स्पष्ट झालंय, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केलं. त्यांनी आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी नागपूर जिल्ह्यातल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांशी संवाद साधला. यावेळी आयोजित वार्ताहर परिषदेत फडनवीस यांनी सांगितलं, की 2017 मध्ये भाजपाच्या नगरसेवकांची संख्या पंधराशे होती, ती या निवडणुकीत ३ हजाराच्या वर गेली आहे. म्हणजे ही संख्या वाढ दुपटीनं वाढली आहे. नागपूर जिल्ह्यात 27 पैकी 22 नगराध्यक्ष भाजपाचे आहेत. या सर्व सत्तावीस शहरांना आपण मॉडेल शहर म्हणून विकसित करणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर रामटेक नगरपालिका काँग्रेस मुक्त केल्या, तर कामठी शहरात नगरपंचायत स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच कमळ फुललं, असे अनेक विक्रम या निवडणुकांनी केले असं फडनवीस यांनी यावेळी सांगितलं