डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 2, 2024 8:37 PM | BJP

printer

भाजपाच्या मुख्यालयातून भाजपा सदस्य मोहिमेला सुरुवात

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भाजपाच्या नवी दिल्ली इथल्या मुख्यालयातून भाजपा सदस्य मोहिमेला  सुरुवात केली. भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडून आपल्या सदस्यत्वाचा नवा दाखल घेत प्रधानमंत्र्यांनी या मोहिमेचा श्रीगणेशा केला. देशाच्या कानाकोपऱ्यातल्या खेड्यांमधल्या नागरिकांना नव्हे तर संपूर्ण खेड्यांनाच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचं सदस्य बनवावं असं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं. 

 

भाजपा हा जगातला केवळ सर्वाधिक मोठा राजकीय पक्ष नसून तो लोकशाहीवादी पक्षही असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यावेळी म्हणाले.