नीट आणि अर्थसंकल्पातल्या तरतुदींवरुन विरोधक जनतेची दिशाभूल करत असल्याची रवी शंकर प्रसाद यांची टीका

नीट आणि अर्थसंकल्पातल्या तरतुदींवरुन विरोधक जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका भाजपा नेते रवी शंकर प्रसाद यांनी आज केली. नीट परीक्षेचे आयोजन योग्यरित्या झालं असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. परीक्षेच्या संदर्भातल्या अनियमितता लक्षात आल्यावर सरकारने तत्काळ सीबीआय चौकशी सुरू केली होती, असंही त्यांनी सांगितलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जगात भारताची नकारात्मक प्रतिमा तयार केली आहे. अर्थसंकल्पात सर्व समाज घटकांसाठी तरतुदी केल्या आहेत. त्यामुळं विरोधीपक्षांनी अर्थसंकल्प नीट वाचून समजून घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला.