September 26, 2024 8:34 PM | Rahul Gandhi

printer

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात भाजपा सरकार अपयशी – विरोधी पक्षनेते राहुल गांधी

हरियाणामधल्या तरुणांसमोर बेरोजगारीचं आव्हान उभं राहिलं असून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात भाजपा सरकार अपयशी ठरल्याची टीका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कर्नाल जिल्ह्यातल्या आसंध मतदारसंघात घेण्यात आलेल्या सभेत आज ते बोलत होते. राज्यात काँग्रेसचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांना तीनशे युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल, तसंच महिलांना दोन हजार रुपये पेन्शन दिली जाईल, असं आश्वासन गांधी यांनी दिलं. या सभेत हरियाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उदय भान, माजी मुख्यमंत्री भुपिंदर सिंह हुड्डा उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.