डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सभापतीपदासाठी उमेदवार दिल्याबद्दल भाजपाची काँग्रेसवर टीका

लोकसभेच्या सभापतीपदासाठी काँग्रेसनं उमेदवार उभा केल्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज टीका केली. ते संसदेबाहेर वार्ताहरांशी बोलत होते. उपसभापतीपदासाठी सरकार चर्चेला तयार आहे मात्र त्यासाठी पूर्व अटी घालणं योग्य नाही असंही ते म्हणाले.

]लोकसभा सभापतीपदासाठी विरोधी पक्षांनी दबावाचं राजकारण केल्याची टीका केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग यांनी केली. सरकारनं या मुद्द्यावर कोणतीही चर्चा केली नाही, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं.