विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून आणखी २५ उमेदवारांची यादी जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं आज २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. वर्सोव्यातून भारती लव्हेकर, घाटकोपर पूर्वमधून पराग शाह, माळशिरसमधून राम सातपुते, आष्टीतून सुरेश धस, सावनेरमधून आशिष देशमुख यांच्यासह इतरांची नावं यात आहेत. बोरीवलीतून संजय उपाध्याय, कारंज्यातून सई डहाके, वसईतून स्नेहा दुबे, लातूरमधून अर्चना पाटील- चाकूरकर यांना उमेदवारी मिळाली आहे. भाजपानं आतापर्यंत १४६ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपानं संतुक हंबर्डे यांचं नाव जाहीर केलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.