November 20, 2024 6:32 PM | BITCOIN

printer

निवडणुकीसाठी बिटकॉईनच्या माध्यमातून पैसे वाटल्याचा भाजपाचा आरोप

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं निवडणुकीसाठी बिटकॉईनच्या माध्यमातून पैसे वाटल्याचा आरोप भाजपाने केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा यात हात असल्याचा आरोप भाजपा प्रवक्ते सांबित पात्रा यांनी आज नवी दिल्ली इथं पत्रकारपरिषदेत केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी त्यांनी केली. या बिटकॉईन घोटाळ्याची रक्कम २३५ कोटी रुपयेपर्यंत असल्याचा अंदाज आहे असं पात्रा म्हणाले.

दरम्यान नाना पटोले आणि सुप्रिया सुळे या दोघांनीही हे आरोप फेटाळले आहेत