डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भाजपा हा संविधान आणि लोकशाही न मानणारा पक्ष – अतुल लोंढे

भाजपा हा संविधान आणि लोकशाही न मानणारा पक्ष असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे केली आहे. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. नागपुरात म्हाळगीनगर आणि मानेवाडा वळण रस्त्याच्या उड्डाण पुलाचा भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला काँग्रेसच्या स्थानिक आमदारांना निमंत्रण दिलं गेलं नसल्याचा दावा करत, हा कार्यक्रम भाजपाचा होता, की राज्य सरकारचा असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. सरकारी प्रकल्पांचे काम हे जनतेने दिलेल्या कराच्या पैशांतून होते, त्यामुळेच अशा प्रकल्पांशी संबंधित कार्यक्रमात तिथल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना आमंत्रण दिले जाते मात्र भाजपा हा नियम पाळत नाही अशी टीकाही त्यांनी केली.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.