डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 12, 2024 6:48 PM | BJP | Rahul Gandhi

printer

राहुल गांधी यांच्या विरोधात उद्या भाजपाचं राज्यभर आंदोलन

राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपा उद्या राज्यभर आंदोलन करणार असल्याचं भाजपाच्या माध्यम विभागानं कळवलं आहे.

 

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यात, तर मुंबईत आमदार आशिष शेलार, आमदार पंकजा मुंडे आंदोलन करणार आहेत. ठाण्यात रवींद्र चव्हाण, जळगावात गिरीश महाजन, पुण्यात चंद्रकांत पाटील, चंद्रपूरमध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे. 

 

याशिवाय अहिल्यादेवीनगरमध्ये राम शिंदे, नाशिकला देवयानी फरांदे, सीमा हिरे, नागपूरमध्ये विक्रांत पाटील, नंदुरबारमध्ये विजयकुमार गावित, विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं जाईल.

 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या संविधानविषयक वक्तव्याविरोधात भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चानं आज नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन केलं. यावेळी राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं.