डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जन्म – मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रीया सुलभ करण्यासाठी नवे नियम लागू

जन्म – मृत्यू नोंदणीची  प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रीया सुलभ आणि पारदर्शक व्हावी याकरता तसंच बनावट प्रमाणपत्र वितरणाला आळा बसावा म्हणून संबंधित नियमात सुधारणा करण्यात आली आहे.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदनाद्वारे ही माहिती दिली. याबाबतची अधिसूचना आज जारी झाली असून ती तात्काळ लागू झाली आहे. 

 

आता जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र जलद गतीने मिळणार असून चुकीचं प्रमाणपत्र दिल्यास थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. अर्जदाराने पुरावे म्हणून जोडलेली कागदपत्रं बनावट आढळल्यास तात्काळ फौजदारी कारवाई करण्यात येईल. जन्म – मृत्यूच्या नोंदणीबाबत एक वर्षापेक्षा अधिक कालावधीने माहिती मिळाल्यास प्राधिकृत दंडाधिकाऱ्याने माहितीच्या अचूकतेबाबत खात्री करुन, विलंब शुल्क आणि इतर कायदेशीर बाबींची पूर्तता करावी आणि नोंद घ्यावी,  अशी सुधारणा नियमात झाली आहे.

काही परदेशी नागरिकांनी बनावट प्रमाणपत्र मिळवल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या, त्या पार्श्वभूमीवर जन्म – मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्यावर गेल्या २१ जानेवारीपासून स्थगिती होती, ती आता हटवली आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा