स्वातंत्र्य सेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी देशभरात आज आदिवासी गौरव दिवस साजरा होत आहे. आजचा दिवस आदिवासी संस्कृतीच्या गौरवशाली इतिहासाचं महत्व अधोरेखित करतो. या निमित्तानं देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शनं आणि शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यंदा बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. यावेळी महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
Site Admin | November 15, 2025 5:40 PM | birsa munda adivadi din
देशभरात आज आदिवासी गौरव दिवस साजरा