डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव आजपासून नवी दिल्लीत होणार

पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव आज संध्याकाळी नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं होत असून, परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. भारत, बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंडमधील कलाकार सादरीकरण करतील. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेनं आयोजित केलेल्या ‘सप्तसूर: सात राष्ट्रे, एक मेलडी‘ महोत्सवात सात बिमस्टेक देशांच्या वैशिष्ट्यपूर्ण संगीत परंपरांचा उत्सव साजरा केला जाईल. हा पहिला संगीत महोत्सव बिमस्टेक सहकार्यातील एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक टप्पा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी एप्रिलमध्ये थायलंडमध्ये झालेल्या बिमस्टेक शिखर परिषदेत भारतात पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव आयोजित करून सांस्कृतिक संबंध मजबूत करण्याची संकल्पना मांडली होती. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.