December 5, 2025 8:36 PM

printer

पान मसाल्यावर अधिभार लावणारं विधेयक लोकसभेत मंजूर

पानमसाला उत्पादन करणाऱ्या केंद्रांवर अधिभार लावण्यासाठीचं विधेयक आज लोकसभेनं मंजूर केलं. यातून मिळणारा निधी राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि नागरिकांचं आरोग्य सुधारण्यासाठी वापरला जाणार आहे. अशा हानीकारक वस्तूंचा वापर कमी करायचा सरकारचा मानस असून आरोग्य हा राज्य सूचीतला विषय असल्यानं या अधिभाराची रक्कम राज्यांनाही दिली जाईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान दिली. ४० टक्के जीएसटीच्या व्यतिरिक्त हा अधिभार लागू होईल, त्यामुळं जीएसटी महसुलावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.