बिहार विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. रालोआ तसंच महायुतीच्या स्टार प्रचारक आणि ज्येष्ठ नेत्यांनी सीमांचल, चंपारण आणि मेगध क्षेत्रासह विविध भागात प्रचारसभा घेतल्या.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पूर्व आणि पश्चिम चंपारण, मधुबन इथं सभा घेतल्या.
संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अरारिया, कटिहार आणि कृष्णगंज इथं सभा झाल्या. तर भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी जमुई आणि बांका इथं सभा घेतल्या.
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोहतास इथं प्रचारसभेला संबोधित केलं.
काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी वाल्मिकीनगर आणि चनपाटिया इथं सभा घेतली. महायुतीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी प्रसाद यादव, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस दिपांकर भट्टाचार्य यांच्याही विविध ठिकाणी सभा झाल्या.