तेज प्रताप यादव यांची पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालु प्रसाद यादव यांनी आपले पुत्र आणि बिहारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं आहे. तेज प्रताप यादव याच्या कथित मैत्रिणीसंदर्भातली पोस्ट समाजमाध्यमांवर पसरली होती. त्यानंतर वर्तणुकीच्या मुद्यावरून त्यांना पक्षातून निलंबित करत असल्याचं लालु प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. बिहारचे विरोधी पक्षनेते आणि  लालु प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी या निर्णयाला सहमती दर्शवली आहे. सार्वजनिक आयुष्यात जबाबदारीनं वागणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.