बिहार मध्ये बौद्ध भिक्खून्नी मधुबनी चित्रकला आणि गानकटोरा सादरीकरणाच्या विविध श्रेणींमध्ये २ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त केली आहेत. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी पाटणा इथं पाटलीपुत्र क्रीडा संकुलात मुख्यमंत्री नितीश कुमार यांना प्रमाणपत्र प्रदान केली. कलाकारांनी पद्मश्री जगदंबा देवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रसिद्ध कलाकार बौआ देवी यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास १९ चौरस मीटरचं मोठं चित्र बनवलं. तर बौद्धगया इथं काल संध्याकाळी ३७५ बौद्ध भिक्खून्नी एकत्र येत गानकटोरा सादरीकरणात विश्वविक्रम केला.
मुख्यमंत्र्यांनी ४ मे ते १५ मे दरम्यान होणाऱ्या आगामी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतला.