बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बुथस्तरावरच्या कार्यकर्त्यांशी नमो ऍपच्या माध्यमातून संवाद साधला. रालोआसाठी एकत्रित काम करण्याचं आवाहन यावेळी मोदी यांनी केलं. संयुक्त जनता दल, लोकजनशक्ती पार्टी रामविलास, राष्ट्रीय लोकमोर्चा आणि हिंदुुस्तानी आवाम मोर्चा हे भाजपाचे मित्रपक्ष असून यांच्या उमेदवारांचा प्रचार करण्याचं आवाहन त्यांनी केलं. लोककल्याणकारी योजनांविषयी जनजागृती करावी असंही मोदी यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.
Site Admin | October 15, 2025 7:39 PM | Bihar Elections | PM Narendra Modi
Bihar Elections : प्रधानमंत्र्यांचा कार्यकर्त्यांशी नमो ऍपच्या माध्यमातून संवाद