बिहार विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागावाटप निश्चित झालं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे ही माहिती दिली. भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दल प्रत्येकी १०१ जागांवर निवडणूक लढवतील, तर लोक जनशक्ती पक्ष रामविलास या पक्षाला २९ जागा दिल्या आहेत. राष्ट्रीय लोक मोर्चा आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चा हे पक्ष प्रत्येकी ६ जागांवर उमेदवार उतरवतील. बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी ६ आणि ११ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून मतमोजणी १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
Site Admin | October 12, 2025 8:00 PM | Bihar Elections 2025 | NDA
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रालोआचं जागावाटप निश्चित