बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची ७१ उमेदवारांची पहिली उमेदवार यादी आज जाहीर झाली. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी तारापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा, लखीसराईतून निवडणूक लढवतील. मंगल पांडेय, नितीन नबीन, रेणू देवी, या आजी-माजी मंत्रिमंडळ सदस्यांचा यादीत समावेश आहे. केंद्रीय मंत्री रामकृपाल यादव यांना दानापूरमधून तिकिट मिळालं आहे. हिंदुस्थानी आवामा मोर्चानंही ६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान भक्तिसंगीत गायिका मैथिली ठाकूरनं आज पाटणा इथं भाजपात प्रवेश केला.
Site Admin | October 14, 2025 8:23 PM | Bihar Elections | BJP
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची पहिली उमेदवार यादी