बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरु झाली आहे. बिहारमधील ३८ जिल्ह्यांतील ४६ मतदान केंद्रावर ही मतमोजणी होत आहे. विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन हजार ६१६ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज ठरणार आहे. मतमोजणीच्या दोन तासांनंतर निकालाचे कल येण्याची शक्यता आहे. टपाली तिकीटांची मोजणी सकाळी ८ वाजेपासून होत आहे.
गेल्या ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान झाले. बिहार विधानसभा निवडणुकीत १९५१ नंतर आतापर्यंतचं सर्वाधिक ६७ पुर्णांक १३ टक्के मतदान झाले.