बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी आठ वाजल्यापासून होणार आहे. ३८ जिल्ह्यांमधे मिळून ४६ मतमोजणी केंद्र आहेत. बिहारमध्ये या निवडणुकीत १९५१ नंतर विक्रमी मतदान झालं आहे. ६१६ उमेदवाराचं भवितव्य असलेले ईव्हीएम त्रिस्तरीय सुरक्षा निगराणीखाली ठेवले आहेत, अशी माहिती बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी विनोद सिंग गुंजीयाल यांनी दिली. सर्वप्रथम टपालानं आलेल्या मतपत्रिका मोजल्या जातील, त्यानंतर ईव्हीएम वरची मतमोजणी सुरु होईल. मतमोजणीसाठी ४ हजारहून अधिक टेबल मांडले आहेत.
नमुना १७ क आणि ईव्हीएम डाटा जुळत नसेल, आणि जिथं प्रात्यक्षिकाचा डेटा नष्ट करायचा राहीला असेल, तिथं व्हीव्हीपॅट मोजणी अनिवार्य करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत.