डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना जारी

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. त्याबरोबरच, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली असून,  अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 ऑक्टोबर आहे. एकंदर 243 सदस्यांच्या विधानसभेसाठी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी, 6 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, 11 नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होईल. 14 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे; मात्र, अद्यापही विविध राजकीय पक्षांमधील जागावाटपाचा तिढा कायम आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांमधे आज जागावाटपाची बोलणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.  भाजपाचे निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान वेगवेगळ्या घटक पक्षांबरोबर बैठका घेणार आहेत. राजद नेता तेजस्वी यादव  यांनी काल देन मित्रपक्षांबरोबर चर्चा केली पण त्यात काहीही तोडगा निघाला नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आज राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्याबरोबर जागावाटपाची चर्चा करणार आहेत.