बिहार विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर १४ नोव्हेंबरला मतमोजणी होईल, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत केली. एकूण २४३ पैकी पहिल्या टप्प्यात १२१ तर दुसऱ्या टप्प्यात १२२ मतदारसंघात मतदान होणार आहे.  

 

जम्मू काश्मीर, राजस्थान, झारखंड, तेलंगणा, पंजाब, मिझोरम आणि ओडिशामधल्या विधानसभेच्या ८ जागांसाठी पोटनिवडणूकही त्यांनी आज जाहीर केली.