बिहार विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारानं वेग घेतला आहे. आज छठ उत्सवाच्या समारोपाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते आणि स्टार प्रचारकांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. महाआघाडीचा जाहीरनामा काल प्रसिद्ध झाला, त्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.
वरिष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय गृृृृृहमंत्री अमित शहा आज बेगुसराय, समस्तीपूर आणि दरभंगा इथं प्रचारसभा घेणार आहेत. तसंच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रचारसभा पाटना जिल्ह्यात होणार आहेत. भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री रालोआ उमेदवारांच्या प्रचारासाठी आज बिहारमधे दाखल होत आहेत.
दुसऱ्या बाजूला महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी दरभंगा आणि मुझ्झफरपूर जिल्ह्यात सभा घेणार आहेत. तसंच राजद नेते तेजस्वी यादव समस्तीपूर, मधेपूर इथं सभा घेणार असून दरभंगा आणि मुझ्झफरपूर इथं ते राहुल गांधींच्या सभेत सहभागी होतील.