November 4, 2025 12:56 PM | Bihar Elections

printer

Bihar Elections : पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार आज संपणार

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या प्रचाराची मुदत आज संध्याकाळी संपणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे मतदारांना आकर्षित करण्याची सर्व पक्षांना आज शेवटची संधी आहे. त्यामुळे रालोआ आणि महाआघाडीच्या सर्व वरिष्ठ नेते आणि स्टार प्रचारकांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. दोन्ही बाजूंनी आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज भोजपूर आणि गयामधे सभा घेणार आहेत. ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मुंगेर, वैशाली, पाटणा आणि सहरसा जिल्ह्यांमधे प्रचारसभेला संबोधित करतील. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचारसभा पूर्व आणि पश्चिम चंपारण तसंच दरभंगा जिल्ह्यात होणार आहेत. 

 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही मतदारांना साद घालण्यासाठी गया आणि औरंगाबाद जिल्ह्यात प्रचारसभा घेणार आहेत. महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदासाठीचे उमेदवार आणि राजद नेते तेजस्वी यादव समस्तीपूर, बेगुसराय, दरभंगा, मुझफ्फरपूर आणि वैशाली जिल्ह्यांमधे एकूण सतरा सभांना संबोधित करणार आहेत. तर समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव महाआघाडीच्या उमेदवारांच्या  प्रचारासाठी गयामध्ये सभा घेणार आहेत. या टप्प्यात अठरा जिल्ह्यातल्या १२१ मतदारसंघात ६ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.