बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआचा विजय नवी दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात आता साजरा होत आहे. बिहारी जनतेनं पुन्हा एकदा विकसित बिहारसाठी, समृद्ध बिहारसाठी मतदान केल्याचं प्रधानमंत्री मोदी यावेळी म्हणाले.
आपण कर्पुरी ठाकूर यांच्या गावातून प्रचाराला सुरुवात केल्याचं सांगून बिहारच्या विकासाला नवीन उंचीवर घेऊन जाऊ असं आश्वासन दिलं. या निवडणुकीने बिहारी जनतेने जंगलराजचा माय फॉर्म्युला उधळून लावत नवीन माय फॉर्म्यूल्याला म्हणजे महिला आणि युथ याला पसंत केल्याचं ते म्हणाले. लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्यांचा विजय असल्याचं सांगत त्यांनी देशातल्या मतदारांना विशेषतः युवा वर्गाला मतदाता सूचीच्या शुद्धीकरणाचं महत्व पटल्याचं ते म्हणाले. सरकार छठ सणाला जागतिक वारसा सूचीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करेल असं त्यांनी सांगितलं. आता कॉंग्रेसचं राजकारण फक्त नकारात्मक असल्याची टीका त्यांनी केली. आता एका विधानसभेत निवडून आलेल्या आपल्या उमेदवारांएवढेही काँग्रेसचे उमेदवार गेल्या सहा विधानसभा निवडणूकीत आलेले नाहीत असं मोदी म्हणाले.