बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. सुरुवातीला मिळालेले कल पाहता भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार बहुतांश जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा आघाडीवर आहेत.
भारतीय जनता पार्टी सर्वात जास्त ९२ जागी आघाडीवर आहे.
त्याखालोखाल जनता दल संयुक्त ८१ ठिकाणी आघाडीवर आहे.
चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष २१ मतदारसंघात आघाडीवर आहे.
महाविकासआघाडीतला राष्ट्रीय जनता दल पक्ष २६ ठिकाणी आघाडीवर आहे.
भारतीय कम्युनिस्ट पार्टी लेनिनवादी चे उमेदवार १ ठिकाणी तर
काँग्रेसचे उमेदवार ४ ठिकाणी आघाडीवर आहेत.
विद्यमान उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, तारापूर मतदारसंघात आघाडीवर आहेत तर राजद नेते तेजस्वी यादव राघोपूरमधे चुरशीची लढत देत आहेत.
बिहारमधे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला यश मिळत असल्याबद्दल मुंबईच्या भाजपा मुख्यालयात आनंदोत्सव सुरु आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं त्यात सहभागी झाले आहेत.