बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची पहिली उमेदवार यादी तयार झाली असून आज संध्याकाळ पर्यंत ती जाहीर होईल असं बिहार भाजपा प्रधेशाध्यक्ष डॉ. दिलीप जयस्वाल यांनी सांगितलं. ते आज पाटणा इथं पत्रकारपरिषदेत बोलत होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे इतर घटक पक्ष देखील आज उमेदवार यादी जाहीर करतील असं जयस्वाल म्हणाले.
प्रतिस्पर्धी महाआघाडीच्या जागवाटपाबाबत वाटाघाटी सुरु असून लौकरच काँग्रेसची यादी जाहीर होईल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश राम यांनी सांगितलं. तिकिटवाटपावर तोडगा निघाला असल्याचं राजद नेता संजय यादव यांनी सांगितलं.